महाराष्ट्र शासन | GOVERNMENT OF MAHARASHTRA

आमची यशोगाथा

  • गुंगवाडा (Gungawada) हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक छोटे आणि निसर्गरम्य गाव आहे. गुंगवाडाआणि परिसराची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
    • भौगोलिक स्थान: हे गाव डहाणू तालुक्याच्या अंतर्गत येते आणि पालघर जिल्ह्याच्या उत्तर कोकण भागात वसलेले आहे. डहाणू हे शहर मुंबईपासून साधारणपणे ११० किमी अंतरावर आहे.
    • लोकजीवन आणि संस्कृती: या भागात प्रामुख्याने कोळी मांगेला समाज व बारी समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. येथील लोक मांगेली व बारी या बोली भाषेचा वापर करतात. पारंपरिक नृत्य हे येथील सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे.
    • हवामान: कोकण किनारपट्टीच्या जवळ असल्यामुळे येथील हवामान उष्ण आणि दमट असते, तसेच पावसाळ्यात येथे भरपूर पाऊस पडतो.

  • पर्यटन आणि प्रेक्षणीय स्थळे: डहाणू किल्ला :- 1533 -34 च्या सुमारास पोर्तुगीजांनी बांधलेला हा ऐतिहासिक किल्ला गुंगवाडा गावाजवळच आहे.
    महालक्ष्मी मंदिर :- गुंगवाडा गावापासून साधारण 35 कि. मी. अंतरावर डहाणू जव्हार रस्त्यावर प्रसिद्ध महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे.
    समुद्रकीनारा :- गुंगवाडा गावाला सुंदर आणि खडकाळ  आणि शांत समुद्रकीणारा लाभलेला आहे जो पर्यटकंसाठी लोकप्रिय आहे
  • अर्थव्यवस्था: येथील मुख्य व्यवसाय मासेमारी, शेती व डायमेकिंग आहे.
  • डहाणू रेल्वे स्टेशन :- गुंगवाडा गावापासून 6 कि. मी अंतरावर डहाणू रेल्वे स्टेशन  आहे.

प्रशासकीय संरचना


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


370
1328
662
666

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo